Thursday, October 14, 2010

क्षण


क्षण
तुझी ती तेजस्वी नीरन्तर नजर
ते एकटक माज्या कडे पाहत बसणे
असे वाटे विसरावे हे जग व हरवुन जावे त्या प्रेमच्या नभात
कधी वाटे वारा येइल व हलवेल त्या पापण्या
इथ वादळ आले मोठे तरीहि पापण्या हलल्या नाही जर पण

ते डोळे मला बोलावतात
हरवते मी तुझ्या माझ्या विश्वात
कधी दिसतेय तुझे प्रेम कधी दिसतात खोलवर नवी नाते
कधी दिसतात मी तुला दिलेल्या असन्ख्य जखमा
कधी दिसतो पश्चातापच वणवा.

पपणी तुझी मग हलते जरा बघुनी मेघ गर्जना
जेव्हा ह्या पापण्यान्च्या ओन्जळीतुन ओसन्डतात मोती जणु
कधी वटते पहावे मोजुन जरा
किती क्षण रोखुन ठेवतात त्या तुझ्या पापण्या
आणी समावुन घेतात मला त्या पापण्यान्च्या सावलीत.

तुझ्या माझ्यातील हा सम्पुर्ण अन्क
भघे हलकेच नभातला चन्द्र
ज्याचि तेजोन्मयम नजर
तारान्कीत करे ती रात्र

सुरेख अशा एका सकाळी
अन्गणात तुझ्या जर दव दिसले तर,
रात्र भर त्या तुज्या नभातील
आठवणीन्चे ते माझे लेणे

फ़ीरकले तुझ्या अन्गणात,त्या फुला वरी जाउन बसले जरासे
थोडा सुवास घेवुनी त्या फुलाचा जरा जपुनी
प्रेमाचे घालत पान्घरुण जरासे
नहीसे झाले नभात खरे.