Friday, September 26, 2008

गीत


दाटला काळोख होता चहु दिशान्नी,
नीरवाचा शाप होता वेदनेला.
त्याच काळोखातूनी पण सूर आले,
विन्धलेल्या काळजाचे गीत झाले

आसवे माझीच माझ्या मालकीची,
अन त्यांना मूक सारे सोसण्याचि।
गाठुनी एकान्त त्याना फीतूर केले,
विन्धलेल्या काळजाचे गीत झाले

लपिविला एक वणवा अन्तरात
अन निखारयाचीच होती पयवाट.
नकळत पण अग्नि ला त्या फूल आले,
विन्धलेल्या काळजाचे गीत झाले

--------- अनामीक----------------

Wednesday, September 24, 2008

वुड रोज


एप्रिल २२ २००८
वुड रोज
हिरकणी (मंगळ।, २२/०४/२००८ - १०:१२)
संध्याकाळच्या वेळी कोवळी उन्ह पडली होती। सहज मी फिरायला निघाले.फिरता फिरता दूर कुठवर एक मंद सौम्य सुवास येऊ लागला.मी त्या सुवासाच्या दिशेने चालत गेले .पुढे बघते तर काय ?मैलो न मेल पसरलेली गावठी गुलाबाची बाग होती पलिकडे. मी जेवढी जवळ गेले सुगंध तेवढंच दरवळू लागला चहू दिशेने. असे वाटले की एका बाटलीत हा सुगंध भरून सांभाळून घरी घेऊन जावे....पण सुगंध असा बंदिस्त करता येत नाही .तो तर दरवळत राहणार खुलून राहणारा गंध.
मग मनात विचार आला की गुलाब केव्हा रोज हे फूल एवढे लोकप्रिय का?अस दडलंय काय ह्या फुलात?मला फुलांविषयी खूप प्रेम आदर आणि कुतूहल आहे.माझे वडील देव पूजा करते वेळी हजार प्रकारची ताजी टवटवीत फूल आणत.त्यांतले वेगळे फूल ते मला आवर्जून दाखवत व त्या फुलाचे वैशिष्ट्य सांगत. ही दुसऱ्याला जाणून घ्यायची कलाच आज मला त्यांच्याकडून शिकायला मिळाली.गुलाबाविषयीचे कुतूहल पण त्यांच्यामुळे मिळाले।
कोणताही असो पांढरा पिवळा लाल गुलाबी किंवा वुड रोज, फुलांचा राजाच तो.परंतू ह्या राजाला असतात हजार काटे.... ह्या काट्यांमुळे गुलाब असेल कदाचित वेगळा .एवढ्या सुंदर फुलाला काटे का पण?हे काटे असतात आडकाठे..सौंदर्याचे आडकाठे. एखाद्या सुंदर स्त्रीच्या गालावर तीळ असतो तसा.एखाद्या राणी मधमाशी भोवती हजार मधमाश्या असतात तसे.राजाची ती सेनाच. म्हाताऱ्या माणसाची काठी तसे हे काटे. कुठलीही सुंदर वस्तू जर उघड्या वर पडली तर तिला बघून आपण सुरक्षित ठिकाणी ठेवतो तर काही जण विध्वंसही करतात त्या सौंदर्याचा.म्हणूनच हे काटे.
कष्ट करायला व कष्टांची कदर करायला पण शिकवतो.खाली हजार कष्टांची काटे असले तरच सदाबहार गुलाब येतो. अर्थात ध्येय असलेल्या कष्टांचेच चीज होते.फाटे फुटलेल्या कंदा ला गुलाब येत नाही बरं का! गुलाबा ला बघून आईचीच आठवण होते. एका गृहिणीची आठवण. गुलाब जसा काटे घेऊन फुलतो ती पण तिच्या संसारात राणी सारखी डुलत राहते.तिला फुलोरा आणावाच लागतो संसाराच्या वाळवंटात.ती घराला सुगंध देतच राहते काट्यांमध्ये राहून.
आठवण करून देतो गरिबीची. गरिबीत राहणाऱ्या हजार हसऱ्या स्वावलंबी लोकांची.काट्यात राहून असे इतरांना सुख देणे सोपे नाही बरं.तसेच असते वुड रोज ह्या जातीचा गुलाब काश्मीर राज्यात मिळतो. वरून खालपर्यंत जणू कोरीव लाकूड.लाकडाचे पण गुलाब असते त्याला वुड रोज म्हणतात. सगळ्या लोकांच्या मना वर राज्य करणारे गुलाबचे फूल किती ऋणी आहोत आपण त्याचे.
ह्या गुलाबच्या माळ्या चे पण नवल वाटते .खुलेपण देऊन विशसाने सातत्याने परिश्रमाने त्याला फुलवावे लगते. एक न संप णारा न खचणारा आधार द्यावा लागतो गुलाब फुलवायला. चला तर मग आपल्या साठी एक गुलकंदी विचार रिजवुनी घेऊया आणि गुलाब फुलवूया आपल्या आयुष्या चा आणी चिमुकल्या जीवांचा आधार बनूयात.

प्रवास


गाव माझेच सोडुनी मी आले...
पाश माझेच तोडुनी मी आले...
गंध माझेच रोखुनी मी आले...
अश्रू माझेच वेचुनी मी आले...
मायेची ती शीतल छाया
आता कुठे हरपली...?
आपुलकीची पायवाट ती
आता कुठे हरवली...?

माणसेही ती जिव्हाल्याची
आता कुठे पांगली...?
.....जन्म नव्याने पुन्हा घ्यायला...
पुन्हा नव्याने मोहरायला...

अतृप्त आत्मा एक जणू मी
आले आईचे हृदय शोधायला...

प्राजक्त हा ईश्वरी.... तयाचा
जन्म इतरांना सुखावायालास
सुकला -कोमेजला जरी हा...
फुलेल पुन्हा तरुवरी शोभायला...

जन्म नवा घ्यायला...
श्वास नवा रुजवायला...
आकाषी परत नवे
नक्षत्र नवे सजवायला...

गाव माझेच सोडुनी मी आले...
पाश माझेच तोडुनी मी आले...

आपुला हिशेब चुकला


तेव्हाच नाही नाही म्हणतले, होकार आज कुठला
दोघात जणतोना आपुला हिशेब मिटला.
मिटला हिशेब म्हणता हसते हळूच कोणी
तू मी असेल कैसे, होणे न हे मुळीच।

मिटला हिशेब म्हणशी मग का असे पहाणे?
डोळ्यात मेघ आहे ऒठान्वरी बहाणे


हे मौन जीवघेणे कासाविस अशी का ? लपाव्या उसासा बाजूस पाहशीका

आपुला हिशेब चुकला आहे कबूल

माझे गणीत कच्चे हातचा चुकुन राही

आन चक्रवादाने जे झाले अमोल देणे
मिर्वीन जन्मोजन्मी शिरी हे अबोल लेणे।


---जुन्या डायरीत सापडलेली कविता---

मृगजळ


एका मृगजळी हरवून गेले मी
त्या पाण्यात पोहून गेले मी
त्या वाळवंटात भाजून निघाले मी
त्या वाऱ्यात गारठून गेले मी


मृगजळ कधी दिसले नाही
पण वेड लावले त्याने मला
त्या मृगजळं च्या शोधात
विद्रूप विद्रोही झाले मी

मग जळ मिलाळे खरे
तृप्त मनी भिजून गेले मी
मग आरशात पाहिले मी
अन मलाच भेटले मी

मृगजळ मध्ये तापून हरवून
भाजून निघाले मी
पण थोड्याशाचं जळा मुळं
सुखावुनी गेले मी

कोणा कसे सांगवे
पण संगावसे वाटते खरे
अथांग चंचल मृगजळा पुढ
दव बिंदू रुपी जळच खरे

शोधता शोधता जे सापडत नाही
ते असते मृगजळ
आशा आकान्शा चे मृगजळ
भरकटून टाकणारे मृगजळ

केव्हा ही कधीही दिसते
ते आहे जळ
आपल्या जीवनाचे अमृत
जीवन फुलवणारे खरे जळ

मृगजळा च्या शोधात
हरवू नकोस माणसा
दव रुपी अल्प आनंदांचा
आस्वाद घ्यायला विसरू नकोस माणसा.

Tuesday, September 23, 2008

विरह

नकोच होते तुज माझे
प्रकाशाचे चांदणे .
वेडच होते प्रेम माझे
सदा सर्वदा आंधळं.

नकोच होता श्वास माझा
नकोच होती बंधने .
पैलतिरी दिसलीच नकळत
आठवणींची स्पंदने.

नकोच होते तुज माझे
स्वप्नांचे नांदणं .
वेचत बसले मी मनी बस
प्राजक्ता चे चांदणं .

प्रश्न पडतो एकच तेवढा
तू नसे जवळ तेधवा .
नकोच होते तुज मी जर
का स्मरते मला आजपण?

दूर कुठवर जळती ज्वाला
इथं का बरसी श्रावणधारा?
दूर कुठवर तेजस्वी चंद्र
इथं चांदणी का फुलवी रंग?