Wednesday, September 24, 2008

प्रवास


गाव माझेच सोडुनी मी आले...
पाश माझेच तोडुनी मी आले...
गंध माझेच रोखुनी मी आले...
अश्रू माझेच वेचुनी मी आले...
मायेची ती शीतल छाया
आता कुठे हरपली...?
आपुलकीची पायवाट ती
आता कुठे हरवली...?

माणसेही ती जिव्हाल्याची
आता कुठे पांगली...?
.....जन्म नव्याने पुन्हा घ्यायला...
पुन्हा नव्याने मोहरायला...

अतृप्त आत्मा एक जणू मी
आले आईचे हृदय शोधायला...

प्राजक्त हा ईश्वरी.... तयाचा
जन्म इतरांना सुखावायालास
सुकला -कोमेजला जरी हा...
फुलेल पुन्हा तरुवरी शोभायला...

जन्म नवा घ्यायला...
श्वास नवा रुजवायला...
आकाषी परत नवे
नक्षत्र नवे सजवायला...

गाव माझेच सोडुनी मी आले...
पाश माझेच तोडुनी मी आले...

No comments: