Wednesday, September 24, 2008

वुड रोज


एप्रिल २२ २००८
वुड रोज
हिरकणी (मंगळ।, २२/०४/२००८ - १०:१२)
संध्याकाळच्या वेळी कोवळी उन्ह पडली होती। सहज मी फिरायला निघाले.फिरता फिरता दूर कुठवर एक मंद सौम्य सुवास येऊ लागला.मी त्या सुवासाच्या दिशेने चालत गेले .पुढे बघते तर काय ?मैलो न मेल पसरलेली गावठी गुलाबाची बाग होती पलिकडे. मी जेवढी जवळ गेले सुगंध तेवढंच दरवळू लागला चहू दिशेने. असे वाटले की एका बाटलीत हा सुगंध भरून सांभाळून घरी घेऊन जावे....पण सुगंध असा बंदिस्त करता येत नाही .तो तर दरवळत राहणार खुलून राहणारा गंध.
मग मनात विचार आला की गुलाब केव्हा रोज हे फूल एवढे लोकप्रिय का?अस दडलंय काय ह्या फुलात?मला फुलांविषयी खूप प्रेम आदर आणि कुतूहल आहे.माझे वडील देव पूजा करते वेळी हजार प्रकारची ताजी टवटवीत फूल आणत.त्यांतले वेगळे फूल ते मला आवर्जून दाखवत व त्या फुलाचे वैशिष्ट्य सांगत. ही दुसऱ्याला जाणून घ्यायची कलाच आज मला त्यांच्याकडून शिकायला मिळाली.गुलाबाविषयीचे कुतूहल पण त्यांच्यामुळे मिळाले।
कोणताही असो पांढरा पिवळा लाल गुलाबी किंवा वुड रोज, फुलांचा राजाच तो.परंतू ह्या राजाला असतात हजार काटे.... ह्या काट्यांमुळे गुलाब असेल कदाचित वेगळा .एवढ्या सुंदर फुलाला काटे का पण?हे काटे असतात आडकाठे..सौंदर्याचे आडकाठे. एखाद्या सुंदर स्त्रीच्या गालावर तीळ असतो तसा.एखाद्या राणी मधमाशी भोवती हजार मधमाश्या असतात तसे.राजाची ती सेनाच. म्हाताऱ्या माणसाची काठी तसे हे काटे. कुठलीही सुंदर वस्तू जर उघड्या वर पडली तर तिला बघून आपण सुरक्षित ठिकाणी ठेवतो तर काही जण विध्वंसही करतात त्या सौंदर्याचा.म्हणूनच हे काटे.
कष्ट करायला व कष्टांची कदर करायला पण शिकवतो.खाली हजार कष्टांची काटे असले तरच सदाबहार गुलाब येतो. अर्थात ध्येय असलेल्या कष्टांचेच चीज होते.फाटे फुटलेल्या कंदा ला गुलाब येत नाही बरं का! गुलाबा ला बघून आईचीच आठवण होते. एका गृहिणीची आठवण. गुलाब जसा काटे घेऊन फुलतो ती पण तिच्या संसारात राणी सारखी डुलत राहते.तिला फुलोरा आणावाच लागतो संसाराच्या वाळवंटात.ती घराला सुगंध देतच राहते काट्यांमध्ये राहून.
आठवण करून देतो गरिबीची. गरिबीत राहणाऱ्या हजार हसऱ्या स्वावलंबी लोकांची.काट्यात राहून असे इतरांना सुख देणे सोपे नाही बरं.तसेच असते वुड रोज ह्या जातीचा गुलाब काश्मीर राज्यात मिळतो. वरून खालपर्यंत जणू कोरीव लाकूड.लाकडाचे पण गुलाब असते त्याला वुड रोज म्हणतात. सगळ्या लोकांच्या मना वर राज्य करणारे गुलाबचे फूल किती ऋणी आहोत आपण त्याचे.
ह्या गुलाबच्या माळ्या चे पण नवल वाटते .खुलेपण देऊन विशसाने सातत्याने परिश्रमाने त्याला फुलवावे लगते. एक न संप णारा न खचणारा आधार द्यावा लागतो गुलाब फुलवायला. चला तर मग आपल्या साठी एक गुलकंदी विचार रिजवुनी घेऊया आणि गुलाब फुलवूया आपल्या आयुष्या चा आणी चिमुकल्या जीवांचा आधार बनूयात.

2 comments:

shrikant said...

Very Good
Nice poem
Continue!!

Anonymous said...

keep it up!